|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| कृष्ण अवधुत देवस्थान, कारला ||

बुकमार्क बटनं

 ☰ Menu
Translate(भाषांतर) :  English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)  
 ✕  Close    


 ✕  Close    

|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
कारला

                 सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान              
|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
            कारला , तालुका : चांदुररेल्वे, जिल्हा : अमरावती,
            राज्य : महाराष्ट ( विदर्भ विभाग ), भारत
Karla Devthan Image

कारला येथे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथाचे १८ व्या शतकातील पुर्ण अवतार कृष्णा जी चे देवस्थान/ राउळ आहे. कारला देवस्थान हे देवमन अवतार व्दारे प्रसारीत चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे एक शाखा आहे. या शाखेला देवमनचा कारला दांड असे म्हणतात. कारला हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे देवमन कारला शाखा चे मुख्य देवस्थान असुन, हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या भजनी योगी, संत, भक्ती ईत्यादी यांना प्रेरणा, स्फुर्ति व सत् शक्ती देणारे देवमन कारला शाखा चे मुख्यस्थल आहे.

१८ व्या शतका पासुन हे देवस्थान/राउळ पुर्ण अवतार कृष्ण मुखातुन निघालेल्या पौरणिक चतुर्पती अथर्वन् वेद चे चतुर्पती आध्यात्मिक ग्यान चे ओवी व भजन गायन, हे १८ व्या शतकातील गादीपती पुनाजी सह हेंगडुजी, देवमनजी, संत भक्तगण व्दारे मिर्तलोकी स्थापीत चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ व्दारे महाराष्टतिल विदर्भ विभागाच्या खेडयापाडयासह शहरात १८ व्या शतकापासुन प्रेरीत करत आहे. आणी या पंथाच्या कार्याला प्रेरणा, स्फुर्ति व शक्ती ईत्यादी पुर्ण अवतार श्री कृष्णाजी सत् भक्तांच्या घरी जावुन देत आहे. अशी धारणा आहे.

कारला येथे पुर्ण अवतार श्री कृष्णाजीची मुख्य बाहोली असुन या बाहुलीवर तो गुप्त कृष्णा ईथे उभा असुन, तो गुप्तरूपाने देवमन सह देवमन च्या कार्यास साहयं करत, येणा-या सत् यवगाची स्थापना अगोदरचे प्रपंच..ईत्यादी कार्य सांभाळ करण्यासाठी, चतुर्पती कृष्ण अवधुत भक्तांना स्फुर्ति, प्रेरणा व शक्ती देत आहे. आपल्या सत् भक्तांच्या घरी जावुन त्या त्या सत् भक्तांकडुन सत् कार्य करवुन घेत आहेत. नित साहयं होत आहे. अशी या कारला शाखा ची धारणा आहे.

चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या या कारला शाखचे भक्त भजनी व योगी यांचा पक्का विश्वास आहे की : देवमन जी हे काशीचे वल्लभ ऋषि यांचा अवतार आहे. आणी हा वल्लभ ऋषी हा सत् यवगाच्या अवलेह मुनी चा अवतार आहे. म्हणुनच देवमन हा सत्यवगाचे अवलेह मुनी यांचा अवतार वल्लभ ऋषी चा अवतार आहे.
काशीचे वल्लभ ऋषि ने जाणले की : कलयवगाच्या संधीकाळात प्रकट झालेला कृष्णा हा चौ रूपांची चर्तुव्युह रूपांची रंचना करून आता पुर्ण अवतार होणार आहे. म्हणुनच पुर्ण अवतार कृष्णाची भक्ती करण्यासाठी आणीक बहु कारणासाठी काशीचे बल्लभ ऋषी यांनी कृष्णाजीला काशीहुन आवाज देवुन, त्यांच्या पुर्वाश्रमीचा भक्त श्री रघुजी राजपुत, (जो आता कृष्णाजीचा परंम् भक्त बनुन कृष्णा संग करत होता) यांच्या घरी प्रकट होउन, चतुर्पती कृष्णाजीची भक्ती करण्यासाठी परवानगी मागतली.

कृष्णाजीच्या परवानगी प्राप्ती नंतर अवलेह मुनी अवतार वल्लभ ऋषि हा कृष्णाजी चा परम्भक्त रघुजी राजपुत यांच्या घरी प्रकट झालेत. कृष्णाच्या सांगीप्रमाणे रघुजी राजपुत यांनी या अवताराचे नाम देवमन असे ठेवले.
प्रकट झालेले देवमनजी पुढेमग कृष्णाजीचे पिसे भक्त बनलेत. आणी पुर्ण अवतार च्या चर्तुव्युह रूपांच्या रंचनेतील एक अवतार झालेत. पुनाजीव्दारे मिर्तलोकी स्थापित चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे कृष्णाजी सह पुनाजी, हेंगडुजी यांचा संह सत् यवग आणण्याच्या कार्यास देवमनजी नित साहय होवु लागलेत. देवमनजी चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे भक्त, भजनी व योगी यांना नित स्फुर्ति व साहय करू लागलेत. अधीक ग्यानाकरीता चतुर्पती अथर्वन् वेद चा कृष्णांमृत भाग वाचा.

 || व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो ||

कृष्ण अवधुती ओवी व भजने
कृष्ण अवधुती भजन मंडळे व राउळे यांचे व्हिडीयो

 || आम्हा शोधा ! ||

आम्हा शोधा !
दिशानिर्देश : इथुन.. इथपर्यत..

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..